ADMISSIONS OPEN. . .
मनोगत
शालेय शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांच्या मनात शिकण्याची गोडी निर्माण करणे हेच आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे. इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत आमच्या संस्थेमध्ये प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र तज्ज्ञ शिक्षक आहेत. आमच्या वर्गांमध्ये कमी विद्यार्थी संख्या ठेवण्यात आली आहे, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देता येईल.
संपूर्ण शिक्षणक्रम शाळेच्या अभ्यासक्रमानुसार पूर्ण केला जातो. प्रत्येक रविवारी घेतल्या जाणाऱ्या चाचण्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा देतात. आमच्या वर्गात टीव्हीच्या साहाय्याने विविध शैक्षणिक ॲनिमेशन, गोष्टी आणि व्हिडीओजद्वारे शिकवणी अधिक प्रभावी केली जाते. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि विषयांची गोडी निर्माण होते.
शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी विशेष वाचन तास, हस्ताक्षर सुधारण्यासाठी नियमित सराव व क्रिएटिव्ह लर्निंग अॅक्टिव्हिटीज आयोजित केल्या जातात. शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये नियमित संवाद ठेवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो.
शिक्षण हा केवळ अभ्यासक्रम मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या भावनिक, बौद्धिक आणि सामाजिक विकासासाठीही आम्ही प्रयत्न करतो .