ADMISSIONS OPEN. . .
मनोगत
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयार करण्यासाठी आमची शिक्षण पद्धत अत्यंत प्रभावी व नियोजनबद्ध आहे. इयत्ता 5 वी ते 10 वी साठी आम्ही मुख्यतः गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करतो.
प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक असतात आणि सर्व तासिका स्वतंत्रपणे घेतल्या जातात. विद्यार्थ्यांच्या समजून घेत शिकण्यावर भर दिला जातो. संपूर्ण अभ्यासक्रम हा शाळेच्या अभ्यासक्रमानुसारच घेतला जातो. दर रविवारी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या तयारीचा सातत्याने मागोवा घेतला जातो.
डाऊट सेशन्स घेतले जातात, जेथे विद्यार्थी आपल्या शंका खुलेपणाने मांडू शकतात. तसेच, टीव्हीवर आधारित डिजिटल शिक्षण पद्धतीमुळे संकल्पना समजून घेणे अधिक सोपे होते. सायन्सचे विविध प्रोजेक्ट्स, विशेषतः Human Body Models, प्रयोगद्वारे समजावून दिले जातात. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी प्रात्यक्षिके आणि प्रोजेक्ट बेस्ट लर्निंग वापरली जाते.
याशिवाय, आमच्या वर्गांमध्ये स्पोकन इंग्लिश, गणिती कोडी, सर्जनशील लेखन, वाचन स्पर्धा अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला जातो.
शिक्षण हे नुसतं गुण मिळवण्यापुरतं मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांचा आत्मविकास, विचारशक्ती आणि आत्मनिर्भरता वाढवण्याचं माध्यम व्हावं, हीच आमची भूमिका आहे.
(Rise Up Academy – गुणवत्तापूर्ण शिक्षणाची विश्वसनीय ओळख)